Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवनिमित्त यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण वंदे मातरम् चे गायन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, सीएचआरओ श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, संचालक (विद्यार्थी कल्याण) डॉ. अद्वैत राठोड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. अजित पाटील, डॉ. ए. एम. गुरव, रुधिर बारदेस्कर, डॉ. उमराणी जे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. अमृतकुवर रायजादे, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, जयदीप पाटील आदींसह विविध विभागाचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारुती देवकर यांनी केले.  कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. आर. ए. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि ग्रुपच्या विविध शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
5.7kmh
97 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page