Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या विविध शाखांमधील २७१ विद्यार्थ्यांची देशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना ९ लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
या ७० हून अधिक नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस ड्राइव्हद्वारे हि निवड करण्यात आली. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, कृषी अभियांत्रिकी, एमबीए, बीबीए, एमसीए, बीसीए, एमबीए -ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, एम.एस्सी. फूड आणि एम.एस्सी. केमिस्ट्री या शाखांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यापीठामध्ये प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे सॉफ्ट स्किल्स, ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल्स, तांत्रिक प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन आणि उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून ते उद्योगक्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जात आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये चांगला फायदा झाल्याचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. प्रदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडीसाठी विशेष मेहनत घेतली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
4.1kmh
73 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page