कोल्हापूर :
भारतातील घटता एकूण प्रजनन दर, वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि दीर्घकालीन विचार करण्याच्या उद्देशाने समृद्ध मातृत्व अभियानाच्यावतीने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन आयोजित करण्यात आले. उदघाटन समारंभाला देशभरातील मान्यवरांची उपस्थिती होती. या राष्ट्रीय कार्यक्रमाला देशभरातून 300 हून अधिक सामाजिक सेवा संस्था व विविध क्षेत्रांतील प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी तसेच 50 हून अधिक धोरणकर्ते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) १.८ पर्यंत घसरला असून, लोकसंख्येच्या स्थिर पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या २.१ या प्रतिस्थापन पातळीपेक्षा तो कमी आहे. महाराष्ट्राचा प्रजनन दर तर १.४ इतका खाली आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कमी प्रजनन दर असलेल्या राज्यांमध्ये भविष्यातील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या, वृद्धांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास यावर होणाऱ्या परिणामांचा वेळीच अभ्यास करण्याची गरज आहे.
घटत्या प्रजनन दरासोबतच वंध्यत्वाची समस्या देखील गंभीरपणे समोर येत आहे. वाढते वय, शहरीकरण, बदलती जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, महिलांमधील PCOS व एंडोमेट्रिओसिस, पुरुष प्रजनन क्षमता तसेच पर्यावरणीय प्रदूषण, कीटकनाशके आणि इतर रासायनिक घटकांचा प्रजनन आरोग्यावर होणारा परिणाम यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
वंध्यत्वाच्या समस्येकडे केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा विषय म्हणून पाहण्याची गरज आहे. वेळेवर तपासणी, योग्य समुपदेशन, परवडणारे उपचार आणि जनजागृतीच्या माध्यमातून अधिकाधिक दाम्पत्यांना मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
समृद्ध मातृत्व अभियानाच्यावतीने प्रजनन आरोग्य आणि वंध्यत्व उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने IVF, IUI आणि इतर प्रजनन उपचार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार व्हावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रीय प्रजनन आरोग्य व प्रजनन क्षमता मिशन, National Fertility & Infertility Registry, प्रत्येक राज्यात Centre of Excellence for Reproductive Medicine, राष्ट्रीय लोकसंख्याशास्त्रीय व प्रजनन आरोग्य धोरण आणि भारताच्या भविष्यातील लोकसंख्या, मनुष्यबळ व वृद्ध लोकसंख्येचा दीर्घकालीन अभ्यास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय संयोजक, समृद्ध मातृत्व अभियानच्या डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले की, भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीकडे भीती किंवा चिंतेच्या दृष्टीने न पाहता, भविष्यासाठी योग्य नियोजन करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. वैज्ञानिक संशोधन, विश्वसनीय आकडेवारी, व्यापक जनसंवाद आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणांच्या माध्यमातून भारत आपली लोकसंख्याशास्त्रीय ताकद पुढील अनेक दशकांपर्यंत टिकवून ठेवू शकतो.
——————————
समृद्ध मातृत्व अभियानाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन कार्यक्रम संपन्न
Mumbai
light rain
26.8
°
C
26.8
°
26.8
°
83 %
6.3kmh
97 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°

