Homeइतरअन्यथा आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकणार

अन्यथा आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकणार

• कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचा इशारा
कोल्हापूर :
गेले १ ते २ महिने कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिक व कार डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सचिव इजाज नागरकट्टी यांनी केला. सोमवारपर्यंत आरटीओ पोर्टल सुरळीत सुरू करण्यात यावे. अन्यथा येत्या गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा इजाज नागरकट्टी यांनी पत्रकार दिला.
यावेळी असोसिएशनने काही मागण्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पोर्टल तातडीने सुरू करा. आधार-RC स्पेलिंग नियम मागे घ्या – शासनाच्याच चुकांसाठी नागरिकांकडून ₹500 दंड घेणे हा अन्याय आहे. PUC साठी OTP सक्ती रद्द करा. अचानक नियम लावणे बंद करा. अशाप्रकारच्या मागण्या केल्या आहेत.
जिल्ह्याला दोन मंत्री असून देखील आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने याची दखल घेतली नाही. तेव्हा याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत RTO पोर्टल सुरळीत सुरू करण्यात यावे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच येत्या गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा देण्यात आला.
पत्रकार परिषदेला विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद,अभिजीत चित्रकार, सुधाकर सासने, प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सकपाळ, शितल दत्तवाडे, समीर तकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page