Homeइतरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी घेतले पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी घेतले पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन

कोल्हापूर :
ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री डॉ. उदय सामंत, मंत्री पंकजा मुंडे आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली.
ज्ञानाचा सागर, शिक्षण महर्षी, अत्यंत विद्वान, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण या सारख्या विविध क्षेत्रात ऊतुंग कामगिरी करणारे थोर अजातशत्रू असणारे थोर व्यक्तिमत्व आपल्यातून हरवल्याची भावना सर्वांनीच यावेळी व्यक्त केली.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, डॉ. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महापौर रूपाराणी निकम, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, जयंत आसगावकर, जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम, अमित देशमुख, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहूल आवाडे, चंद्रदीप नरके, माजी मंत्री सर्वश्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, मालोजीराजे छत्रपती, राजू आवळे, राजीव आवळे, अभिनेता सयाजी शिंदे, भरत जाधव,  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली. गेले दोन दिवस दर्शनासाठी जनसागर लोटला होता. दोन दिवस सर्व सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
81 %
7.2kmh
100 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page