Homeइतरवन विभागात वनपाल व वनरक्षकांसाठी मार्गदर्शन व क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात

वन विभागात वनपाल व वनरक्षकांसाठी मार्गदर्शन व क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर :
कोल्हापूर वन विभागामार्फत वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन व क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. गुरुवारी झालेल्या या कार्यशाळेत वन व्यवस्थापन, वन्यजीव संवर्धन, जैवविविधता, बचाव कार्य तसेच जमिनीच्या नोंदी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत सकाळी झालेल्या पाच सत्रात देवेंद्र भोसले यांनी “मानव-वन्यजीव संघर्ष” या विषयावर सविस्तर माहिती देत संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे व वनरक्षक श्री. शिंदे यांनी “पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रण” या विषयावर मार्गदर्शन करून पक्षी निरीक्षणाची तंत्रे व निसर्ग छायाचित्रणाचे महत्त्व स्पष्ट केले.
त्यानंतरच्या सत्रात ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनचे स्वप्नील पवार यांनी “पश्चिम घाटातील जैवविविधता” या विषयावर माहिती देत पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. आकाश राऊत यांनी. “पश्चिम घाटातील ऑर्किड व कंदील पुष्प” या विषयावर सादरीकरण करून दुर्मिळ वनस्पतींची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विशाल पाटील यांनी बचाव पथकामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती देऊन आपत्कालीन परिस्थितीत त्याचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात श्रीमती प्रियंका डळवी (वनीकरण व कॅम्पा) व कार्यालय अधीक्षक विराज मोहिते यांनी जमिनीसंदर्भातील शासन निर्णयांचे वाचन व त्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. त्यानंतर विराज मोहिते व प्रशांत हवालदार यांनी आय-पास ॲपवर डी.पी.डी.सी. कामांचे अहवाल व छायाचित्रे अपलोड करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली. सर्व्हेअर तानाजी चौगुले यांनी नमुना क्रमांक-१, जमिनीची नोंदणी प्रक्रिया तसेच त्यामध्ये आवश्यक असणारी विविध कागदपत्रे व दस्तऐवज याचे सादरीकरण केले. जमिनीच्या अभिलेखांची अचूकता, आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता आणि नोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केल्या.
शेवटच्या सत्रात सर्व्हेअर विभीषण चोळे व जीआयएस तज्ज्ञ रोकेश गायके यांनी केएमएल फाइल, जीपीएस आणि बाउंड्री पिलर्स याविषयी सविस्तर माहिती देऊन आधुनिक भू-अभिलेख व्यवस्थापनातील त्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
या मार्गदर्शन कार्यशाळेमुळे वनपाल व वनरक्षकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व क्षेत्रीय ज्ञान अधिक सक्षमपणे आत्मसात करण्याची संधी मिळाली. वन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षणाची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
85 %
9.8kmh
99 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page