कोल्हापूर :
जून महिन्यात सक्रिय मोबाईल ग्राहकसंख्या वाढविण्यात रिलायन्स जिओने देशात आघाडी कायम राखली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, जिओने जून महिन्यात 33.3 लाख सक्रिय (VLR) मोबाईल ग्राहकांची भर घातली. त्यामुळे जिओची सक्रिय मोबाईल ग्राहकसंख्या 49.89 कोटींवर पोहोचली आहे. देशातील एकूण 120.11 कोटी सक्रिय मोबाईल ग्राहकांपैकी जिओचा बाजारातील हिस्सा सुमारे 41.5 टक्के इतका झाला आहे.
जून महिन्यात जिओने एकूण 21.5 लाख नवीन मोबाईल ग्राहक जोडले असून, कंपनीची एकूण मोबाईल ग्राहकसंख्या 50.36 कोटींवर पोहोचली आहे. 39.3 टक्के बाजारहिस्स्यासह जिओ देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा प्रदाता कंपनी म्हणून कायम आहे. सक्रिय ग्राहकसंख्येच्या बाबतीत भारती एअरटेलने 29.3 लाख सक्रिय ग्राहक जोडले, तर व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्या सक्रिय ग्राहकसंख्येत घट नोंदविण्यात आली.
फिक्स्ड लाईन सेवांमध्येही जिओने आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. जून महिन्यात कंपनीने सुमारे 1.44 लाख नवीन वायरलाइन कनेक्शनची भर घातली. त्यामुळे जिओची एकूण वायरलाइन ग्राहकसंख्या 1.56 कोटींवर पोहोचली असून, या क्षेत्रात कंपनीचा बाजारातील हिस्सा 32.7 टक्के आहे.
5G फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस (FWA) सेवेमध्ये जिओची ग्राहकसंख्या 91.14 लाखांवर पोहोचली असून, देशातील एकूण 5G FWA ग्राहकांपैकी 70.5 टक्के ग्राहक जिओकडे आहेत. जून महिन्यात कंपनीने सुमारे 1.46 लाख नवीन 5G FWA ग्राहक जोडले. तसेच UBR-आधारित फिक्स्ड वायरलेस सेवा पुरविणारी जिओ ही देशातील एकमेव कंपनी असून, या सेवेंतर्गत ग्राहकसंख्या 49.34 लाखांवर पोहोचली आहे.
ट्रायच्या आकडेवारीनुसार, जूनअखेर देशातील एकूण दूरध्वनी ग्राहकसंख्या वाढून सुमारे 134.8 कोटींवर पोहोचली आहे.
—————————— ————————-

——————————