Homeशैक्षणिक - उद्योग ग्रुप क्वालिफाय नसणाऱ्यानाही होता येणार इंजिनियर

ग्रुप क्वालिफाय नसणाऱ्यानाही होता येणार इंजिनियर

कोल्हापूर :
बारावीमध्ये शिकत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्याची इच्छा असते आणि त्यामुळे ते विद्यार्थी बारावीला गणित हा विषय घेऊन बोर्डाची परीक्षा देतात, CET किंवा JEE ची परीक्षा देतात आणि बऱ्याच वेळेला त्या मुलांना CET किंवा JEE मध्ये चांगले मार्क्स मिळतातही परंतु त्यांचा इंजिनिअरिंग साठी आवश्यक असणारा PCM ग्रुप क्वालिफाय होत नाही, त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा येते. अशा वेळेला काही विद्यार्थी एक वर्ष गॅप घेऊन, पुन्हा परीक्षा देऊन, चांगले मार्क्स मिळवून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अश्या वेळेस विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान होते व काही विद्यार्थी यामध्ये यशस्वी होत नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊनही अपयश आले आहे किंवा ज्यांना ग्रुप क्वालिफाय न होऊन ही इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे ठरविले आहे असे विद्यार्थी ‘ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग’ मध्ये आपले करिअर करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये आपलं करिअर करायचे असेल पण ते PCM ग्रुप क्वालिफाय करत नसतील परंतु बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 45% मार्क्स व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 40% मार्क्स मिळाले असतील आशा विद्यार्थ्यांना आता ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्याचा मार्ग उपलब्ध आहे.
ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग नंतरच्या संधी
१) करिअर संधी –
बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) मध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा अंतर्भाव होत असल्याने व महाविद्यालयांची संख्या मर्यादित असल्याने या पदवीधरांना मोठ्या प्रमाणात संधी आहेत. याबाबत थोडक्यात माहिती खालील प्रमाणे :
 ट्रॅक्टर, पॉवर टिलर, थ्रेशर, हार्वेस्टर उत्पादक कंपन्या.
 विविध प्रकारची फवारणी यंत्रे, पेरणी यंत्रे, नांगर, रोटावेटर, कल्टीवेटर, ट्रॉली, कापणी यंत्रे उत्पादक कंपन्या.
 ड्रीप, स्पिंकलर, रेनगन, फॉगर्स, पंप उत्पादक कंपन्या.
 लँडस्केप डिझाईन, इरिगेशन मॅनेजमेंट, ड्रेनेज (कृषी) व्यवस्थापन,  ग्रीनहाऊस इरिगेशन डिझाईन करणाऱ्या कंपन्या.
 कृषी प्रक्रिया, फळ प्रक्रिया, मसाले प्रक्रिया, ग्रेडिंग सॉर्टिंग पॅकिंग उद्योग, मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती, अन्नपदार्थ निर्यात कंपन्या, बीजप्रक्रिया कंपन्या व बीज महामंडळ.
 सोलर पॉवर कंपन्या, विविध सोलर उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्या.
 कृषी क्षेत्रास सेवा देणाऱ्या कंपन्या.

२) उद्योग / स्वयंरोजगार संधी –
 विविध कृषी अवजारे, यंत्रे साधने यांचे उत्पादन किंवा नामांकित कंपन्यांची डीलरशीप व ट्रेडिंग.
 ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कृषी यंत्रे यांची डीलरशीप व ट्रेडिंग.
 कृषीमाल साठवणुकीसाठी कोल्डस्टोरेज सेवा निर्मिती.
 प्रक्रिया उद्योग उभारणी.
 कृषी निविष्ठा पुरवठा केंद्र.
 ॲग्रीकल्चर मॉल उभारणी.
 कृषीमाल एक्सपोर्ट.
 ॲग्रो क्लीनिक ॲग्री बिझनेस सेंटर.
 ड्रिप/स्पिंकलर/पाईप पुरवठा केंद्र/डीलरशीप.
तसेच बी.टेक. नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास खालील ठिकाणी करिअर संधी उपलब्ध आहेत.
केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थांमध्ये कृषी शास्त्रज्ञ-
 सेंट्रल वॉटर कमिशन
 फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया
 जलसंधारण विभाग
 बीज प्रक्रिया महामंडळ
 कृषी उद्योग विकास महामंडळ
 कृषी विभाग
 पाटबंधारे विभाग
 पणन महामंडळ
याचबरोबर सर्व शासकीय व प्रायव्हेट बँकांमध्ये, जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती या ठिकाणी ॲग्रीकल्चर ऑफिसर/एक्सटेंशन ऑफिसर होता येत.
इतर पदवीधरां प्रमाणे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मध्ये MPSC, UPSC परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होता येते. त्याच प्रमाणे कृषी सेवा, वन सेवा, NABARD या परीक्षा खास कृषी पदवीधरांसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षा देता येतात.

३) उच्च शिक्षणाच्या संधी-
 GATE ची प्रवेश परीक्षा देऊन IIT व NIT येथे प्रवेश घेता येतो.
 ICAR-JRF ची प्रवेश परीक्षा देऊन देशभरातील सर्व केंद्रीय कृषी विद्यापीठ, राज्य कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येतो. वरील दोन्ही परीक्षा पास झालेस पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची कनिष्ठ संशोधन फेलोशिप मिळते.
 महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी MCAER ची सामायिक प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घेता येतो.
 राष्ट्रीय स्तरीय MBA प्रवेश परीक्षा (CAT, CMAT, MAT, XAT, NMAT, SNAP, ATMA & GMAT), राज्य स्तरीय MBA प्रवेश परीक्षा (MAH CET, TANCET, TSICET, KMAT etc.) व संस्था स्तरीय MBA प्रवेश परीक्षा (IIFT MBA, IBSAT, MICAT, IRMASAT etc.)  देऊन IIM मध्ये तसेच इतर नामांकित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये MBA करता येते.
 विविध संस्थांच्या प्रवेश परीक्षा देऊन Agri Business मध्ये  MBA करता येते.

       ऋषिकेश शिंदे
          रजिस्ट्रार
डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्याल, तळसंदे

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.7 ° C
27.7 °
27.7 °
84 %
6.6kmh
100 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page