Homeशैक्षणिक - उद्योग प्रा.खरटमोल, श्री व सौ.डॉ. नलावडे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पेटंट

प्रा.खरटमोल, श्री व सौ.डॉ. नलावडे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पेटंट

• सांडपाण्यातील हानिकारक रंगद्रव्य काढण्याचे तंत्र युके सरकारकडून मान्य
कोल्हापूर :
औंध शिक्षण मंडळ संचलित राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध येथील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असणारे संशोधक प्रा. राजेश मारुती खरटमोल व त्यांचे पी.एचडीचे मार्गदर्शक  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथील प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश मारुती नलावडे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सौ. रेखा नलावडे यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या ‘लॅबोरेटरी डिव्हाइस फॉर सिन्थेसायजिंग मेटल फेराईट ग्राफीटिक कार्बन नायट्राईड नॅनोपार्टीकल’ या अभिनव प्रयोगशाळा उपकरणाला युके सरकारचे पेटंट मंजूर झाले आहे. नॅनोतंत्रज्ञान आणि पर्यावरणीय संशोधन क्षेत्रातील ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात असून या यशामुळे औंध शिक्षण मंडळ व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे.
याबाबत प्रा. खरटमोल म्हणाले, ‘या उपकरणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे डाय डिग्रेडेशन क्षेत्रातील त्याचा प्रभावी उपयोग. औद्योगिक सांडपाण्यातील हानिकारक रंगद्रव्यांचे विघटन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रगत नॅनोमटेरियल्सची निर्मिती या उपकरणाद्वारे अधिक परिणामकारक पद्धतीने करता येते. त्यामुळे पर्यावरण संरक्षण, जलप्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासासाठी हे संशोधन भविष्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.’
डॉ.अविनाश नलवडे म्हणाले, ‘या संशोधनामध्ये अत्याधुनिक नॅनोपार्टिकल्सच्या निर्मितीसाठी उपयुक्त असे विशेष प्रयोगशाळा उपकरण विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण मेटल फेराईट आणि ग्राफिटिक कार्बन नायट्राइड नॅनोपार्टिकल्सच्या संश्लेषण प्रक्रियेला अधिक अचूक, कार्यक्षम आणि संशोधनाभिमुख बनवते.’
याबद्दल औंध शिक्षण मंडळ औंध संस्थेच्या चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, व्हा. चेअरमन श्रीमंत चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, सर्व विश्वस्त, सचिव प्रदीप कणसे, सहसचिव प्रा. संजय निकम व दिपक करपे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page