Homeशैक्षणिक - उद्योग श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतसंस्था सभासद कल्याण योजनेतून अर्थसहाय्य

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतसंस्था सभासद कल्याण योजनेतून अर्थसहाय्य

• रुपये ४ लाख ७९ हजार १६५ रकमेचे अर्थसहाय्य
कोल्हापूर :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभासद कल्याण योजनेतून मयत सभासद संस्थेचे सभासद कै. पाटील सुरगोंडा आनंदा, शाखा न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज यांच्या  वारसांना रक्कम रुपये ४ लाख ७९ हजार १६५ रकमेचे अर्थसहाय्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते देण्यात आले.
एखाद्या सेवकाच्या किंवा सभासदाच्या आकस्मित निधनामुळे होणारे कुटुंबाचे नुकसान हे मोठे असते. अशावेळी एखादे छोटेसे आर्थिक सहकार्यही त्यांच्या कुटुंबांना दुःखामध्ये सावरणेसाठी महत्त्वाचे असते आणि अशावेळी पतसंस्थेने सहकार्य केल्याने संस्थेच्या या योजनेस सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. पतसंस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमधे सर्व सभासदांनी सहभाग घेऊन भविष्यामधील कुटुंबाचा संभाव्य आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
पतसंस्थेचे सभासद कै. पाटील सुरगोंडा आनंदा, शाखा न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज यांनी पतसंस्थेकडे सभासद कल्याण ठेव योजनेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांचे दिनांक ९/६/२०२६ रोजी निधन झाले. त्यांनी संस्थेकडे कर्ज घेतेवेळी सदर योजनेत भाग घेतल्यामुळे, त्यांच्या वारसांना कल्याण ठेव योजनेतून ४ लाख इतक्या रकमेचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले. कै. सुरगोंडा पाटील यांचे संस्थेकडील शेअर्स व अन्य जमा रक्कम यांच्यासह रक्कम रुपये ४ लाख ७९ हजार १६५ इतक्या रकमेचा चेक त्यांच्या वारसांना शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व संस्था कुटुंबप्रमुख प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, व्यवस्थापक कमिटी सदस्य व कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, शिक्षणसंस्थेचे  सहसचिव सिताराम गवळी, सातारा विभागप्रमुख शशिकांत काटे व पुणे विभाग प्रमुख श्री. साकोरे, पतसंस्थेचे सेक्रेटरी संपत वेटाळे उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
28 ° C
28 °
28 °
68 %
3.2kmh
61 %
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
32 °

Most Popular

You cannot copy content of this page