• पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल स्पर्धा
कोल्हापूर :
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेत गेम ऑफ गोल (जीओजी) एफसी संघाने गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. तर स्निग्मय एफसी संघाने दुसरा क्रमांक पटकावला.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत जीओजी एफसी संघाने १६ सामन्यात १५ विजय, १ पराभव व ४६ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, स्निग्मय एफसी संघाने १६ सामन्यात १३ विजय, १ बरोबरी, २ पराभव व ४० गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. संगम स्पोर्ट्स क्लब संघाने १६ सामन्यात १२ विजय, १ पराभव, ३ बरोबरी व ३७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत जीओजी एफसी संघाने चेतक एफसी संघाचा ७-० असा एकतर्फी पराभव केला. जीओजी एफसी संघाकडून सुमित भंडारी याने तीन गोल, तर श्रीकांत मोलनगिरी, सतीश हवालदार, साकेत कुलकर्णी, सुरजबहादूर थापा यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात स्निग्मय एफसी संघाने इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब संघाचा ५-१ असा पराभव केला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व ५०,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी व मंदार ताम्हाणे, सचिव प्रदीप परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएफएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय चौधरी, पीडीएफएचे समिती सदस्य उपस्थित होते.
——————————
जीओजी एफसी संघ विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31
°
C
31
°
30.9
°
70 %
4.6kmh
78 %
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

