Homeइतरआधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या डिझाईनला पेटंट

आधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या डिझाईनला पेटंट

• शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश
कोल्हापूर :
येथील संशोधकांनी विकसित केलेल्या “मॅग्नेटिक स्टिरर विथ पार्टिशन्ड ऑइल बाथ” या आधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या संरचनेला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. विविध शास्त्रीय अभिक्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या यंत्राचे डिझाईन तयार करण्यात राजाराम महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी योगदान दिले आहे.
राजाराम महाविद्यालयातील डॉ. सूरज अशोक सोनवणे, अनिल पांडुरंग मराळे, डॉ. ओमप्रकाश बन्सीधर पवार आणि शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील मेकॅनिकल इंजिनियरिंगचे डॉ. हर्षवर्धन चंद्रकांत पंडित या अभिनव डिझाईनचे संशोधक आहेत.
हे उपकरण रसायनशास्त्र, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया तसेच विविध संशोधन प्रयोगशाळांमध्ये द्रव नमुन्यांचे एकाच वेळी सुरक्षित, अचूक आणि कार्यक्षम मिश्रण तसेच तापमान नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विभागीय तैलस्नान या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेमुळे एकाच उपकरणात स्वतंत्र विभागांमध्ये एकाच वेळी विविध नमुन्यांवर प्रयोग करता येतात. त्यामुळे नमुन्यांमधील परस्पर परिणाम टाळले जातात, प्रयोगांची अचूकता वाढते आणि संशोधन अधिक सुरक्षित व परिणामकारक बनते.
या उपकरणाच्या आकर्षक, कार्यक्षम आणि आधुनिक औद्योगिक रचनेला डिझाईन पेटंट मंजूर झाल्यामुळे संशोधकांच्या या नाविन्यपूर्ण कार्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या डिझाईन पेटंटमुळे भविष्यात संशोधन प्रयोगशाळांसाठी अधिक कार्यक्षम उपकरणांच्या निर्मितीस चालना मिळणार असून, उद्योग-शैक्षणिक सहकार्य, तंत्रज्ञान विकास आणि “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेलाही बळ मिळणार आहे.
या संशोधनाबद्दल कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर तसेच राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता बोडके यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page