कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथील आठ विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेच्या उद्योजकता केंद्र (इंटरप्रेनरशिप सेल-) अर्थात ई सेलच्या ‘कॅम्पस ॲम्बेसेडर पदासाठी निवड झाली आहे. प्रतिक दिलीप तुपे, समीक्षा राजेंद्र पाखरे, वेदिका विजय वाघमारे, सुफियान सलीम मुल्ला, समीक्षा राजेंद्र सावंत, साक्षी शिवाजी बरगाले, तनुजा रामचंद्र गायकवाड आणि गायत्री संभाजी फुटाणे यांची निवड झाली आहे.
हे विद्यार्थी ‘कॅम्पस ॲम्बेसेडर’ म्हणून आयआयटी बॉम्बेच्या ई-सेलशी समन्वय साधून संस्थेतील विद्यार्थ्यांपर्यंत उद्योजकता आणि नवोपक्रमाशी संबंधित उपक्रमांची माहिती पोहोचविणे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे तसेच उद्योजकता संस्कृतीला चालना देण्यासाठी योगदान देणार आहेत. उद्योजकता विकास व करिअर मार्गदर्शन कक्षाचे समन्वयक प्रा. शोएब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, टेक्निकल कॅम्पस संचालक डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असि. रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे आठ विद्यार्थी आयआयटी मुंबईच्या ई-सेल ‘कॅम्पस ॲम्बेसेडर’पदी
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28.9
°
28
°
78 %
5.1kmh
41 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

