Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद महाविद्यालयात नूतन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचा स्वागत समारंभ उत्साहात

विवेकानंद महाविद्यालयात नूतन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचा स्वागत समारंभ उत्साहात

कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयात नूतन प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारलेल्या डॉ. मिलिंद हुजरे यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून व संस्था प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कौस्तुभ गावडे यांनी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक, संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
स्वागताला उत्तर देताना प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी महाविद्यालयाची समृद्ध परंपरा जपत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, विद्यार्थी विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रो. (डॉ). सी. बी. पाटील यांनी केले. याच कार्यक्रमात महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकपदी बढती झालेले डॉ. ए. एस. महात, डॉ. जी. के. सोनटक्के, डॉ. कैलास पाटील, डॉ. एस. एस. अंकुशराव आणि डॉ. टी. सी. गौपाले यांचाही सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रो. (डॉ) एकनाथ आळवेकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रबंधक सचिन धनवडे, ज्युनिअर सायन्स विभागाचे प्रमुख प्रा. एम. आर. नवले व ज्युनि. आर्टस कॉमर्स विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
77 %
8.1kmh
100 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page