Homeकला - क्रीडारविवारी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धा

रविवारी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धा

कोल्हापूर :
पुणे स्थित गोल्डलिफ एंन्टरटेन्मेंटच्या वतीने तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार दि. १२ जुलै २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानावर होणार आहे.
मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्व अय्यर म्हणाले की, दुसऱ्या आवृत्तीला पुणेकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी अशा प्रकारची इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यात प्लॅस्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे.
तसेच, विशेष म्हणजे यावर्षी या स्पर्धेत दुसऱ्या वर्षी पावाथॉन या तीन किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत स्पर्धकांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसोबत सहभागी होता येणार आहे. या विशेष शर्यतीमुळे जीवनशैलीमध्ये आरोग्यपूर्ण आणि आरोग्य प्राणी चपळ अशा एका विशेष शैलीचे भर पडणार असून आपल्या प्राण्या प्राण्यांबरोबर त्यांना निकटचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे पुण्यातील निसर्ग सौंदर्याचा आणि पावसाळ्यातील हवामानाचा आपल्या लाडक्या सोबत याबरोबर आनंद घेता येणार आहे, असेही अय्यर म्हणाले.
यातील २१ कि.मी. अंतराची अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरु होऊन तळजाई डोंगर, पद्मावती पार्किंग, ट्रेझर पार्क मार्गे अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज चौक मार्गे सदू शिंदे क्रिकेट मैदानावर संपेल. १० कि.मी. अंतराची शर्यत दोन टप्प्यात आणि ५ कि.मी. शर्यत एका टप्प्यात धावेल. स्पर्धेत एकूण ५०,०००रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ८ जुलै २०२६ असणार आहे.
ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनसाठी नावनोंदणी करण्यासाठी https://www.townscript.com/e/green-pune-monsoon-hill-marathon-3-323244 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक चौकशीसाठी आयोजकांशी भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल) मीरा सामंत 7219804030 यांच्याशी संपर्क साधावा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
6.7kmh
81 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page