• डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार उत्साहात
कोल्हापूर :
१२ वी विज्ञान (PCB) नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, हेल्थकेअर, अलाईड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्र हे भविष्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी १२ वी PCB नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये रविवारी झालेल्या “१२ वी PCB नंतरच्या करिअर संधी” या विषयावरील सेमिनाराला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, आरोग्य क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. विद्यार्थांनी आवड, क्षमता व संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडावे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक सुविधा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित पाटील यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, संशोधन क्षेत्र, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट तसेच देश-विदेशातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळातील नव्या करिअर क्षेत्रांचा अभ्यास करून योग्य दिशा निवडावी, असे आवाहन केले.
यावेळी फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य प्रा. मनिषा बिजापूरकर, फार्मसी कॉलेजचे डॉ. अभिनंदन पाटील, स्कूल ऑफ हॉस्पीटलीटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, स्कूल ऑफ इंजिनिआरिंग अँड मॅनेजमेंटचे विभागप्रमुख प्रा. अभिजित मटकर, सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरीचे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांनी विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम, सुविधा, करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले.
प्रा. सुरज यादव व प्रा मैथिली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित पाटील यांनी आभार मानले. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, नर्सिंग प्राचार्य डॉ. उमाराणी जे., उपकुल सचिव संजय जाधव, जयदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक, विविध विभागांचे अधिकारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
——————————
१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मा
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.7
°
C
27.7
°
27.7
°
87 %
11.6kmh
100 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

