कोल्हापूर :
भारतीय पशु चिकीत्सा परिषद आणि केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, मंत्रालयाचा पशु संवर्धन विभागाच्या अंतर्गत श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर यांना नुकतीच पशुवैद्यकीय महाविद्यालय २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून अधिकृत परवानगी मिळाली आहे.
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार राज्यात प्रथमच खाजगी तत्वावरील पशुवैद्यकीय महाविद्यालय चालवली जाणार आहेत. एकूण ५ खाजगी तत्वावरील पशुवैद्यकीय महाविद्यालयापैकी एक पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय विभागाच्या २५ जून २०२६ च्या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेले आहे. यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा या भागातील विद्यार्थ्यांना ‘पशु वैद्यक’ बनण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण ८० प्रवेश क्षमता असून नीट परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवतेनुसार प्रवेश देण्यात येईल. एकूण प्रवेश क्षमतेच्या पैकी ४० जागा व्यवस्थापन वर्गवारीत असतील. पशूवैद्यकीय अभ्यासक्रमाचा कालावधी साडेपाच वर्षाचा राहील. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर येथे पशुवैद्यकीय शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. १२०० संख्येच्या वर असलेली प्रशस्त देशी प्रजातीमधील गोशाळा, जनावरांचे वंधत्व निवारण केंद्र, श्वान संगोपन केंद्र, अश्वशाळा, वराहपालन, कुकुटपालन, महाविद्यालयाची आकर्षक इमारत, सुसज्ज प्रयोग शाळा, प्रशस्त गोठे, जनावरांचे अद्यावत पशु चिकित्सालय, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग इत्यादी या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ठे आहेत.
पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री. पशु संवर्धन मंत्रालय महाराष्ट्र सरकार, भारतीय पशु चिकित्सा परिषद आणि मत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय महाविद्यालय पुढील महिन्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.
——————————
कणेरी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29
°
C
29
°
29
°
61 %
7.1kmh
23 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°

