कोल्हापूर :
रिलायन्स रिटेलला ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’च्या ‘इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर २०२६’ या प्रतिष्ठित यादीत भारतातील काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्यांमध्ये १३वे स्थान मिळाले आहे. या यादीत हिल्टन, सिस्को सिस्टिम्स इंडिया आणि सिंक्रोनी इंटरनॅशनल सर्व्हिसेस यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत.
रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी रिटेल साखळी चालवणारी कंपनी असून, देशभरात कंपनीचे १,३०,४५७ कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या कर्मचारीवर्गासह टॉप-१०० कंपन्यांमध्ये १३वे स्थान मिळवणे ही कंपनीच्या मजबूत कार्यसंस्कृतीची आणि कर्मचारी-केंद्रित दृष्टिकोनाची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि रिलायन्स रिटेल यांना संयुक्तपणे ‘इंडियाज बेस्ट एम्प्लॉयर्स अमंग नेशन-बिल्डर्स’ या विशेष श्रेणीतही गौरविण्यात आले आहे. रोजगारनिर्मिती, अत्यावश्यक सेवा आणि देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कंपन्यांना हा सन्मान दिला जातो.
‘ग्रेट प्लेस टू वर्क’ची क्रमवारी कर्मचारी अनुभव आणि संस्थेच्या कार्यसंस्कृतीच्या सर्वंकष मूल्यांकनावर आधारित असते. यामध्ये ट्रस्ट इंडेक्स सर्व्हेला ७५ टक्के आणि कल्चरल ऑडिटला २५ टक्के वजन दिले जाते. संस्थेच्या मते, या यादीतील निवड कोणत्याही परीक्षकांच्या वैयक्तिक मतावर नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायावर आणि संस्थेतील कार्यसंस्कृतीवर आधारित असते.
ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेलमधील वाढता विस्तार, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पुरवठा साखळी आणि स्टोअर ऑपरेशन्समध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा सन्मान रिलायन्स रिटेलच्या कर्मचारी-केंद्रित कार्यसंस्कृतीची आणि उत्कृष्ट कार्यस्थळ उभारण्याच्या वचनबद्धतेची साक्ष देणारा ठरला आहे.
——————————
रिलायन्स रिटेलला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’च्या भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत १३वे स्थान
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27
°
C
27
°
27
°
87 %
7.8kmh
100 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°

