Homeसामाजिकराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन

• पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्पहार अर्पण
कोल्हापूर :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीचे इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शाहू जन्मस्थळ संग्रहालयासाठी जमीन हस्तांतरण तसेच कोल्हापूर इतिहास संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30 ° C
30 °
29.9 °
74 %
5.1kmh
83 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page