कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील प्रयोगशाळा सहाय्यक सदानंद हिंदुराव दुर्गुळे हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यानिमित्त त्यांचा सेवागौरव समारंभ बुधवारी (दि.२४) ग्रंथालय हॉल येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशासकीय प्रतिनिधी हितेंद्र साळुंखे यांनी केले. निष्ठावान सेवक म्हणून एम. आर. पाटील यांच्यानंतर एकाच शाखेवर नोकरी पूर्ण होऊन त्याचठिकाणी सेवानिवृत्त होणारे म्हणजे सदानंद दुर्गुळे होय. अत्यंत कामसू, तोंडी सूचनेद्वारे योग्यरितीने पत्रे तयार करणे, कॉलेज व संस्था कामासाठी कधीही बोलावल्यास हजर राहणारे असे श्री. दुर्गुळे यांचे व्यक्तिमत्व असल्याचे नमूद केले. यानंतर श्री. दुर्गुळे यांचा परिचय सर्वांना करुन देऊन उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमात पुढे महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. सौ. नीता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे हस्ते श्री. व सौ. दुर्गुळे यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ, श्रीफळ, पोशाख, मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कौस्तुभ गावडे यांनी संस्थेच्यावतीने त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्युनियर कॉलेजकडील प्रा. विश्वंभर कुलकर्णी, स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे, निवृत्त सेवक भरत कवठेकर, माजी जिमखानाप्रमुख प्रा. किरण पाटील, सौ. प्रियंका बीडकर, बी. व्होक. विभागाकडील प्रयोगशाळा सहाय्यक अमित साळुंखे, ज्युनि. सायन्स विभागाकडील प्रा. एस. टी. शिंदे, माजी अकौंटंट एम. आर. पाटील आदींनी आपल्या मनोगतात श्री. दुर्गुळे यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती सदानंद दुर्गुळे यांनी सत्कारास उत्तर देताना, या संस्थेमुळे मी घडलो, मला कौटुंबिक स्थैर्य मिळाले. संस्थेने मला एकाच शाखेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी हा क्षण अतिशय भावनीक असल्याचे नमूद केले. सेवा कशी करावी याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणून श्री. दुर्गुळे यांचेकडे पाहता येईल त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी काम करावे असे गौरवोद्गार काढले.
शेवटी कनिष्ठ लघुलेखक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी श्री. दुर्गुळे यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, हितचिंतक, आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक प्रा. डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये सदानंद हिंदुराव दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
76 %
4.7kmh
98 %
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°

