• सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी
कोल्हापूर :
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (एमसॅक्स) यांच्या ‘मिशन एड्स सुरक्षा’ अभियानात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्याला ‘सुरक्षित प्लस’ श्रेणीत आणण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस डॉक्टर विभावरी देशमुख नॅशनल कन्सल्टंट, नॅको, डॉ राहुल जाधव, सहसंचालक एमसॅक्स, आरोग्य विभाग, खाजगी वैद्यकीय तज्ज्ञ तसेच संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत १ डिसेंबर २०२६ पर्यंत एचआयव्ही नियंत्रणासाठी निश्चित करण्यात आलेली ‘९५:९५:९९’ उद्दिष्टे साध्य करण्याचे लक्ष्य आहे. यानुसार अंदाजीत एचआयव्ही संसर्गित ९५ टक्के व्यक्तींना स्वतःच्या स्थितीची माहिती असणे, निदान झालेल्या किमान ९५ टक्के व्यक्तींनी एआरटी उपचारांवर असणे आणि उपचार घेणाऱ्या ९९ टक्के व्यक्तींमध्ये विषाणूचे प्रमाण नियंत्रित असणे अपेक्षित आहे.
मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत एचआयव्ही, सिफिलिस आणि हिपॅटायटीस-बी या संसर्गांचे माता ते बालक संक्रमण शून्यावर आणण्याच्या ‘ट्रिपल एलिमिनेशन’ उद्दिष्टावरही भर देण्यात आला आहे. सर्व गर्भवती महिलांची शंभर टक्के तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तीनही उद्दिष्टे पूर्ण करून माता-बालक संक्रमण रोखणाऱ्या जिल्ह्याला ‘सुरक्षित प्लस’ दर्जा मिळणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी एचआयव्हीबाबत जनजागृती, तपासणी आणि उपचार वाढविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. नागरिकांनी सुरक्षित वर्तनाचा अवलंब करावा, वेळेत तपासणी करून घ्यावी तसेच एचआयव्ही संसर्गित व्यक्तींविषयी भेदभाव न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असेही सांगितले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी आभार मानले. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सरिता थोरात, आरोग्य अधिकारी महानगरपालिका डॉ. प्रकाश पावरा, डॉ. मनीष नागावकर, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. एस. ए. तगारे, डॉ. निरंजन राठोड, डॉ. सागर कुरुंदकर, डॉ. विजय गावडे, डॉ. सुदर्शन गौरकर उपस्थित होते.
——————————
मिशन एड्स सुरक्षा अभियानात कोल्हापूरचा समावेश
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

