Homeशैक्षणिक - उद्योग श्री दत्त साखर कारखाना सेवकांच्या पतसंस्थेची ५०वी अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहात

श्री दत्त साखर कारखाना सेवकांच्या पतसंस्थेची ५०वी अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहात

कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन २०२५-२६ करिता ५०वी अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभेपुढील सर्व तेरा विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सर्व सभासदांना प्रवासी बॅगेचे वितरण करण्यात आले. अहवाल वर्षात संस्थेला ७० लाख ७५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून दहा टक्केप्रमाणे लाभांश रक्कम सर्व सभासदांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षापासून सभासदांच्या अडीअडचणीला मदत करत, त्यांच्या हिताला प्राधान्य देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालवली जात आहे. शंभर टक्के वसुलीची शाश्वती असल्याने नफाही चांगला मिळत आहे. सर्व कामगारांनी व्यसनमुक्त होण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त झाल्यास कुटुंबाला फायदा होण्याबरोबरच समाजामध्येही मान आणि प्रतिष्ठा मिळत जाते. सध्या परिस्थिती फारच बिकट झाली असून सेवानिवृत्तीनंतर आपल्या हक्काचे पैसे आपल्या हातात राहणे आवश्यक आहे. वारेमाप खर्च न करता बचत करण्याची दृष्टी ठेवून पुढे जाणे गरजेचे बनले आहे.
संस्थेचे चेअरमन सुधाकर शहापूरे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेताना म्हणाले, संस्थेने सभासदांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना एक लाख रुपये मदत देण्याची योजना सुरू केली असून मार्च २०२६ अखेर सहा मयत सभासदांच्या वारसांना सहा लाख रुपये इतकी रक्कम अदा केली आहे. तसेच संस्थेचे सभासद सेवानिवृत्त किंवा मयत झाल्यानंतर त्यांना ११ हजार रुपये इतकी रक्कम अंतिम पगारातून दिली जाते. अहवाल सालात एकूण ७१ सभासदांना सात लाख ८१ हजार रुपये अदा केले आहेत. सभासदांना १४ कोटी दोन लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले असून १०० टक्के वसुली होत आहे.
संस्थेचे सचिव महेश परीट यांनी विषयवार नोटीस वाचन व खुलासा केला. सर्व सभासदांनी एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संस्थेचे लेखापरीक्षक एस. एस. मुळे, फायनान्स मॅनेजर संजय भोसले, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, डॉ. कुमार पाटील, अनिल स्वामी, यशवंत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्री महालक्ष्मी देवीची सुवर्ण प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचलन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी मानले. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर संजय चौगुले, लेखा परीक्षक सहकारी अजित चौगुले, श्रीमती दीपा भंडारे, एच. आर. मॅनेजर जयदीप देसाई, यशवंत माने, सतीश पोतदार याचबरोबर सर्व खाते प्रमुख, संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय कांबळे, सर्व संचालक, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page