Homeराजकियश्री अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामकाजाचा आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या...

श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामकाजाचा आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवारी (दि.२०) सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल.
महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत हा विकास प्रकल्प राबवला जात आहे. नवीन प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना मंदिर प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुसज्जता आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. तसेच परिवार देवता मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण केले जाणार आहे.
यावेळी, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सह पालकमंत्री कोल्हापूर माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर महानगरपालिका महापौर रुपाराणी निकम, सर्वश्री आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, विनय कोरे, राजेंद्र पाटील (यड्रावकर), चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, विभागीय आयुक्त, पुणे शीतल तेली-उगले उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची कोल्हापूर येथील पोलिस ग्राऊंडवर सकाळी १० वाजता राजकीय सभा तसेच इचलकरंजी येथे सहकारी बँकेचा कार्यक्रम व राजकीय सभा होणार आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page