कोल्हापूर :
शिवाजी विदयापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधील १९ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगासह सरळसेवा भरतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांत भरीव यश प्राप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक पदापासून ते आरोग्य सेवकापर्यंतची पदे या विद्यार्थ्यांनी मिळविली आहेत. यातील काही जणांची तर तीन-तीन पदांवर निवड झाली आहे. ही माहिती केंद्राच्या समन्वयक डॉ. कविता वड्राळे यांनी दिली.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. धनाजी शेळके (एमपीएससी, पोलीस उपनिरीक्षक), महेश साळुंखे (एमपीएससी, पोलीस उपनिरीक्षक), अतुल मानकर (एमपीएससी राज्य कर निरीक्षक), सुहेल मुल्ला (एमपीएससी कर सहाय्यक), कल्पक चिले, (एमपीएससी कर सहाय्यक), सुरज कांबळे, (तीन पदे- १. महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, ३. आरोग्य सेवक, आरोग्य विभाग), पंकज पाटील (तीन पदे- १. ज्युनिअर असिस्टंट, जिल्हा परिषद, पुणे २. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन ३. आरोग्य सेवक, जिल्हा परिषद, सातारा), दिनेश साबळे (चार पदे- १. सिव्हील इंजिनियर असिस्टंट, जलसंपदा विभाग, सातारा, २. नगर अभियंता, सोलापूर महानगरपालिका ३. सिव्हील इंजिनियर असिस्टंट, पाटबंधारे विभाग ४. ज्युनियर इंजिनियर, जिल्हा परिषद, कोल्हापूर), कुणाल दैव (तलाठी, सांगली), सुनिल कांबळे, (दोन पदे- १. कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग, २. पवित्र पोर्टल, शिक्षक), प्राजक्ता पाटील (मोजणीदार, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन), रोहित पाटील (रेल्वे बोर्ड, ट्रॅक मेन्टेनर), पंकज खंबाईत (तलाठी, नाशिक), शिवराज पाटील (कार्यकारी सहाय्यक, मुंबई महानगरपालिका), ओंकार रणदिवे (फायर ब्रिगेड, मुंबई महानगरपालिका), नितीन वळवी, (लॅब अटेंडंन्ट, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज), राकेश लोहार, (लॅब अटेंडन्ट, गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज), अनिल टेंगले, (आरोग्य सेवक, आरोग्य विभाग), संदेश साठे (पवित्र पोर्टल, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद, सातारा).
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांना शिवाजी विदयापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————
शिवाजी विद्यापीठाच्या १९ विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांत यश
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2
°
C
28.2
°
28.2
°
81 %
7kmh
78 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°

