Homeशैक्षणिक - उद्योग नेत्रदांनाच्या माध्यमातून होईल अंधाचे जीवन प्रकाशमय : डॉ. मोरे

नेत्रदांनाच्या माध्यमातून होईल अंधाचे जीवन प्रकाशमय : डॉ. मोरे

• डी. वाय. पाटील कृषीमध्ये नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात
कोल्हापूर :
नेत्रदान ही मानवतेच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ सेवा आहे. मृत्यूनंतर केलेले नेत्रदान एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी देऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने या महान कार्यासाठी पुढाकार घ्यावा. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तत्काळ नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करता येते अशी माहिती डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्रतज्ञ डॉ. तुकाराम मोरे यांनी दिली.
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय व डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत जागतिक नेत्रदान जनजागृती दिनानिमित्त आयोजित जागरूकता मोहीम व मोफत नेत्र तपासणी कॅम्प कार्यक्रमांत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. मोरे यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदानाचे महत्व सांगून नेत्रदाना संबंधित समज गैरसमज दूर केले. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. डी .वाय .पाटील कृषी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य पी. डी. उके यांनी विद्यार्थ्यानी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदान व नेत्र तपासणीसारख्या जनहिताच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुहास पाटील, प्राचार्य डी. एन. शेलार, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे व प्रा. आर. आर. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. के. मयेकर व प्रा. एस. ए. इंगवले यांनी केले. स्वयंसेवक रिया वीर हिने सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. एस. के. मयेकर यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
81 %
7kmh
78 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page