कोल्हापूर :
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे प्रख्यात संगीततज्ज्ञ, तबलावादक तथा मार्गदर्शक प्रा. डॉ. पं. सचिन कचोटे यांच्या विशेष सांगीतिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
कार्यशाळेत “संगीत आणि मानवी जीवन” तसेच “संगीत क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी” या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनातील सकारात्मकता वाढविणारे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. पं. सचिन कचोटे यांनी केले.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक समाधान मिळवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक कला जोपासली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या उत्कृष्ट तबलावादनाने उपस्थित विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत संगीत क्षेत्राविषयीची आपली जिज्ञासा व्यक्त केली.
कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर तसेच उपप्राचार्या मनिषा अंब्राळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना संगीतकलेचे महत्त्व पटवून देत अशा उपक्रमांमधून सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या संगीत विभागातर्फे मान्यवरांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्राविषयी नवी प्रेरणा आणि दिशा देणारी ही कार्यशाळा संस्मरणीय ठरली.
——————————
जागतिक संगीत दिनानिमित्त पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांगीतिक कार्यशाळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

