Homeकला - क्रीडाअखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत जिनपॉल सोना, इलिशा पाल यांना विजेतेपद

अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत जिनपॉल सोना, इलिशा पाल यांना विजेतेपद

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू मेमोरियल योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन २०२६ स्पर्धेत पुरुष गटात दिल्लीच्या जिनपॉल सोना याने तर, महिला गटात कर्नाटकाच्या इलिशा पाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत पुरुष गटात कृष्ण प्रसाद जी. व पृथ्वी रॉय के. यांनी, महिला गटात शिखा गौतम व अश्विनी भट यांनी आणि मिश्र दुहेरीत नितीन कुमार व लिखिता श्रीवास्तव यांनी विजेतेपद पटकावले.
भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये अंतिम फेरीत एकेरीत पुरुष गटात अव्वल मानांकित दिल्लीच्या जिनपॉल सोना याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या रवीचा २४-२२, २१-१४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
महिला गटात अंतिम फेरीत कर्नाटकच्या इलिशा पाल हिने दिल्लीच्या ऋषिका नंदीचा २१-१४, १४-२१, २१-०७ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
दुहेरीत अंतिम फेरीत पुरुष गटात आंध्रप्रदेशच्या कृष्ण प्रसाद जी. व कर्नाटकच्या पृथ्वी रॉय के. यांनी आसामच्या सूरज गोआला व कर्नाटकाच्या निकोलस नॅथन राज यांचा २१-१४, २१-१३ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिला दुहेरीत अंतिम लढतीत अव्वल मानांकित कर्नाटकाच्या शिखा गौतम व अश्विनी भट के. या जोडीने तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या श्रेया बालाजी व दिल्लीच्या लिखिता श्रीवास्तव यांचा २१-१२, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मिश्र दुहेरीत अंतिम सामन्यात दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित नितीन कुमार व लिखिता श्रीवास्तव यांनी चंदीगढच्या आयुष मखिजा व महाराष्ट्राच्या सिमरन सिंघी यांचा २२-२०, २१-१० असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक व दहा लाख रुपयांची रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीएमसीचे माजी महापौर व नगरसेवक योगेश बेहल, टीओसी बॅडमिंटन एशियाचे चेअरमन ओमर रशिद, अनुराधा नातू, उल्हास शेट्टी, वेदांत स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अशोक भोसले, योनेक्स सनराईजचे बालकिशन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूना गेम फाउंडेशनचे संचालक गिरीश नातू, दिपक शेट्टी, विश्वास देशवंडीकर, यश भोसले, पीडीएमबीएचे उपाध्यक्ष शशांक हळबे, सरचिटणीस सीए रणजीत नातू, स्पर्धा सचिव राजीव बाग आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page