कोल्हापूर :
राज्यात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून, त्याचे वाढते व्यसन तरुणाईसाठी घातक ठरत आहे. देशाचे भवितव्य घडविणाऱ्या युवकांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रिय राहील, अशी ग्वाही भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कृष्णराज महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे करून युवकांशी संवाद साधला. या दौऱ्यांदरम्यान अनेक युवक-युवती नशेच्या आहारी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करवीरनगरीत करण्यात आली. कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.१२) कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील दूध कट्ट्यावर दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राज्यातील विविध गावे आणि शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. मिरजकर तिकटी येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. नशामुक्त महाराष्ट्र हा उपक्रम समाजासाठी कौतुकास्पद आणि दिशादर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाचे पुढे व्यापक जनचळवळीत रूपांतर होईल, असा विश्वासही कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
नशामुक्त महाराष्ट्रासाठी भाजप युवा मोर्चा सक्रिय राहणार : कृष्णराज महाडिक
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

