कोल्हापूर :
सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख व वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिली मानली जाणारी १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक यशामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील एका धर्मादाय रुग्णालयाने जागतिक वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले की, वैद्यकीय साहित्य आणि जागतिक संशोधनामध्ये अशा प्रकारच्या रुग्णाची नोंद यापूर्वी कधीही झालेली नसल्याने ही केस अत्यंत दुर्मिळ आणि अभूतपूर्व मानली जात आहे. या परिस्थितीत शस्त्रक्रियेतील अगदी छोटी चूकसुद्धा रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकत होती. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांचा रक्तपुरवठा कायम राखत आजारी रक्तवाहिनीचे सुरक्षित व्यवस्थापन करणे हे अत्यंत मोठे आव्हान होते.
ही केवळ रक्तवाहिनीची बायपास शस्त्रक्रिया नव्हती, तर वैद्यकीय क्षेत्रातील अशक्यतेच्या सीमेलाच दिलेले आव्हान होते. ही कौशल्य, विज्ञान आणि आत्म्याची मॅरेथॉन होती. १७ तासांच्या अखंड समन्वित कामातून नवा विक्रम रचला गेला. ही शस्त्रक्रिया कोणत्याही मेट्रो शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये किंवा मोठ्या केंद्रीय संस्थेत झाली नाही. ती सिद्धगिरीसारख्या ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात झाली. Cavernous Internal Carotid Artery (ICA) Aneurysm आणि अत्यंत दुर्मिळ PPTA रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीमुळे ही शस्त्रक्रिया मोठे आव्हान होती. न्यूरोसर्जरी, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजी व नर्सिंग विभागाच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती सध्या उत्तम आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ने १३ व १४ जून २०२६ रोजी होणाऱ्या प्रतिष्ठित ब्रेन बायपास कार्यशाळेसाठी सिद्धगिरी हॉस्पिटलची निवड केली आहे. ग्रामीण धर्मादाय रुग्णालयाला प्रथमच हा मान मिळाला असून देश-विदेशातील न्यूरोसर्जन्स या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला न्यूरो भूलतज्ज्ञ डॉ . प्रकाश भरमगौडर व न्यूरो पॅथोलॉजिस्ट डॉ. प्रतिमा मरजक्के उपस्थित होते.
——————————
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची दुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी
Mumbai
scattered clouds
31
°
C
31
°
31
°
60 %
5.8kmh
38 %
Wed
31
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
30
°
Sun
30
°

