कोल्हापूर :
महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीने रविवारी (दि.१४) कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निवास उर्फ बापू लाड, किशोर जामदार, प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विजयसिंह सावंत, संदीप सावंत, व्ही. के. पाटील, किरण माळी, निलेश पाटील, बी. एस. पाटील, विशाल पाटील, ऋतुराज पाटील, प्रशांत शेलार, सुनील नागराळे, सोहम दळवी आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात विविध शासकीय विभागांचे मार्गदर्शन, कंत्राटदारांच्या अडचणी, शासन धोरणे तसेच संघटनेच्या भावी वाटचालीवर चर्चा होणार आहे.
थकीत देयके तातडीने अदा करणे, ई-टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता, अनुभव व आर्थिक निकष व्यवहार्य करणे, जीएसटी भरपाई, कंत्राटदारविरोधी अटी रद्द करणे आदी प्रमुख मागण्यांवर विचारविनिमय होणार असून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजू बी कृष्णानी, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे महासचिव एम. ए. हकीम, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेदगे, कंत्राटदार कौशिक देशमुख, संजय मैद, सुबोध सरोदे, प्रवीण उंबरकर आदी उपस्थित राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत.
——————————
राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे महाअधिवेशन रविवारी कोल्हापुरात
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

