Homeशैक्षणिक - उद्योग शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील

• आघाडीच्यावतीने कुलगुरु आणि प्र-कुलगुरूंचे स्वागत
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. आर. के. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक उपक्रमांना आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आघाडीतर्फे सहकार्य व पाठबळ देऊ, अशी ग्वाही आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
अध्यक्ष डॉ. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. कामत आणि डॉ. जाधव यांचे स्वागत केले. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही डॉ. पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिली.
डॉ. आर. के. कामत यांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू. विद्यापीठाला नवी उंची मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी पारंपरिक विद्यापीठांचे प्रश्न समस्या यावर चर्चा झाली. विद्यापीठाचे नाव भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आघाडीचे उपाध्यक्ष भैय्या माने, डॉ. प्रताप पाटील, डॉ. डी. आर. मोरे, के. एस. चोगले, कौस्तुभ गावडे, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. मंजिरी मोरे, ॲड. अभिजित कापसे, डॉ. एस. एस. घाळी, डॉ. आर. वाय. पाटील, प्रा. अनिल कुराडे, संजय जाधव, विनोद पंडित, डॉ. दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
82 %
8kmh
82 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page