कोल्हापूर :
शेतकऱ्यांना भूमीहिन करुन त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चातील शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द’ अशी घोषणा असलेली पांढरी टोपी घातली होती. तसेच हातामध्ये शक्तीपीठ विरोधातील फलक घेतले होते.
‘रक्ताचे पाट वाहिले आणि आमचा जीव गेला तरी आम्ही आमची जमीन देणार नाही’ असा निर्धार व्यक्त करीत गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सकाळी ११:३० वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ गावांमधून प्रस्तावित असलेल्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत महिला शेतकरीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. मोर्चातील स्त्रिया व पुरुष शेतकऱ्यांच्या हातात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील फलक होते. यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, सत्यजित पाटील सरुडकर, शिवसेनेचे विजय देवणे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार जयंतराव पाटील, संपतबापू पवार पाटील, सत्यजित पाटील आदींसह विविध नेत्यांनी शेतकऱ्यांच्या भावना मांडत सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली.
या मोर्चात खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, संपतबापू पवार – पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, ए. वाय. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उदय नारकर, अतुल दिघे, चेतन नरके, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, सचिन विश्वास पाटील, किशोर पाटील, जिल्हा बॅक संचालक सुधीर देसाई, बाबासो देवकर, गोपाळराव पाटील, जि. प. सदस्य एकनाथ पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पोवार, माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे, विक्रांत पाटील किणीकर, पी. डी. घुंदरे, सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, गिरीष फोंडे,प्रकाश पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, आर. वाय. पाटील, डॉ. के. एन. पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
——————————
शक्तीपीठ महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
83 %
9.5kmh
84 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

