कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामंकित कंपन्याकडून १२५ हून अधिक जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत.
यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या ऑफर्सची संख्या १२५ पेक्षा अधिक असून जॉन्सन कंट्रोल्स कंपनीने ६.५६ लाख रुपये वार्षिक वेतनाचे सर्वोच्च पॅकेज दिले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स तसेच मुलाखत पूर्वतयारीचे मार्गदर्शन नियमितपणे दिले जात असल्यामुळे प्लेसमेंटमध्ये सातत्याने यश मिळत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईगडे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना १२५ हून अधिक जॉब ऑफर्स
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

