Homeसामाजिक'समृद्ध मातृत्व अभियान' ही काळाची गरज : खासदार सुधाकर सिंग

‘समृद्ध मातृत्व अभियान’ ही काळाची गरज : खासदार सुधाकर सिंग

कोल्हापूर :
‘समृद्ध मातृत्व अभियान’ अतिशय महत्वपूर्ण असून ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार सुधाकर सिंग यांनी केले. नांदेड सिटी, पुणे येथे झारखंड, उत्तरप्रदेश व बिहार येथील नागरिकांच्या नॉर्थ इंडियन वेलफेअर असोसिएशन मेळाव्यात ते बोलत होते.
खासदार सुधाकर सिंग म्हणाले की, जगात गेल्या काही काळात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यांचा अभ्यास केला असता असे निदर्शनास येते की, येणाऱ्या काळात वंध्यत्व ही भीषण समस्या होणार आहे. आधुनिकतेमुळे अपत्य होऊ न देण्याची पद्धत सुरु झाली आहे. करिअरसाठी अपत्य होऊ न देता राहण्याचा कल वाढत आहे. नंतर हीच लोक अपत्य होण्यासाठी चिंताग्रस्त दिसतात. यामुळे वंध्यत्व ही भीषण समस्या होणार आहे. विविध लसीकरण यामुळेही वंध्यत्व समस्या वाढत आहे. भारतात आंध्रप्रदेश, गोवा सारखी काही राज्य त्यांच्या राज्यात प्रजजन दर घसरत असल्यामुळे चिंताग्रस्त असून यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्नशील आहेत. पण देशभरात यासाठी सक्रिय प्रयत्नांची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, डॉ. वर्षा पाटील यांच्या पुढाकाराने व सेवा भावाने सिद्धागिरी जननी ‘समृद्ध मातृत्व अभियान’ सुरु करण्यात आले आहे. देशभरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून केंद्र सरकार यांच्या सोबत त्या लवकरच दिशादर्शक धोरण राबवतील याची मला खात्री आहे. या अभियानातून फार मोठं कार्य होणार असून मानवी जनुकीयसूत्रांचे जतन होणार आहे. डॉ. वर्षा पाटील यांच्या सेवाभावाला त्यामुळे मी लोकप्रतिनिधी म्हणून वंदन करतो. भारतातील अनेक खासदार व लोकप्रतिनिधी या अभियानात सहभागी झाले असून आठ राज्यात हे अभियान पोहचले आहे.
यावेळी डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या की, वंध्यत्व समस्या शाप नसून त्यावर योग्यवेळी योग्य उपचार केल्यास चांगले परिणाम मिळतात. वंध्यत्व प्रक्रियेत लोकांना जागरूक करणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. ही जागरूकता आली तर आय.यु.आय. अथवा आय.व्ही.एफ. असे महागाडे उपचार घेण्याची गरज ही पडणार नाही. त्यामुळे लोकांना सहज उपलब्ध होतील असे वंध्यत्व उपचार मिळणे ही त्यांची मूलभूत गरज आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणतीही स्त्री मातृत्व सुखामुळे वंचित राहू नये यासाठी शासनाला यासाठी प्रभावी धोरण राबावावे लागेल. म्हणून आपल्या सर्वांची मत शासनाला समजावी म्हणून ‘समृद्ध मातृत्व अभियान’ राबवत आहोत. यावेळी त्यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली.
ॲड. नरसिंह लगड यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रणव पांडे, बिनोदकुमार सिंग, ओमप्रकाश सिंग, राकेश सिंग, रागिणी लगड, आर्य लगड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page