कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचा संशोधक विद्यार्थी अक्षय राजाराम जुंदळे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी दि. २० मे रोजी प्राप्त झाली आहे.
अक्षय जुंदळे यांनी संगमरवरी दगडांच्या पृष्ठभागावर सुपरहायड्रोफिलिक आणि सुपरहायड्रोफोबिक गुणधर्म असलेली टिटानिआ व सिलिका नॅनोपार्टिकलचा वापर करून विशेष कोटिंग्ज विकसित केले. या कोटिंग्जमुळे पृष्ठभागावरील धूळ, घाण व सेंद्रिय प्रदूषके आपोआप दूर होण्यास मदत होते. तसेच पावसाचे पाणी किंवा सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पृष्ठभाग स्वच्छ राहण्याची क्षमता वाढते. या संशोधनाचा उपयोग ऐतिहासिक वास्तू, स्मारके, मंदिरे, शिल्पकला तसेच आधुनिक इमारतींमधील संगमरवरी पृष्ठभागांचे संरक्षण, संवर्धन व देखभाल खर्च कमी करण्यासाठी होऊ शकतो. सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हे संशोधन खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या संशोधनासाठी त्यांना विभागप्रमुख डॉ. संजय सुभाष लठ्ठे यांचे मार्गदर्शन लाभले. अक्षय जुंदळे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
——————————
विवेकानंद कॉलेजच्या अक्षय जुंदळे यांना पीएच.डी.
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
83 %
9.1kmh
93 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°

