• अनुज बांगडे, शिवांश मुसळे व साईराज शिंदे ठरले मालिकावीर
कोल्हापूर :
येथील दुधाळी मैदानावर रामराज्य प्रतिष्ठान आणि सेक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आप्पा चषक २०२६’ या ८, १० आणि १२ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेतील तिन्ही वयोगटांतील अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. ८ वर्षांखालील गटात सेक अकॅडमीने अजिंक्यपद पटकावले, तर १० आणि १२ वर्षांखालील गटात महाराष्ट्र अकॅडमीने विजेतेपद मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
बालवयातील खेळाडूंना पायाभूत स्तरावर संधी मिळावी आणि त्यांच्यातील क्रीडागुणांना चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
८ वर्षांखालील गटात सेक अकॅडमी विजेता तर एसएस सॉकर अकॅडमी उपविजेता ठरला. मालिकावीरचा बहूमान अनुज बांगडे याला मिळाला.
१० वर्षांखालील गटात महाराष्ट्र अकॅडमी विजेता तर चॅम्पियन अकॅडमी उपविजेता ठरले. मालिकावीर म्हणून शिवांश मुसळेला गौरविण्यात आले. १२ वर्षांखालील गटात महाराष्ट्र अकॅडमी विजेता तर चॅम्पियन अकॅडमी उपविजेता ठरले. मालिकावीर साईराज शिंदे ठरला.
स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उत्कृष्ट खेळाडूंना यशराजराजे छत्रपती, पृथ्वीराज महाडीक, जयेश पाटील घरपणकर, सतीश पाटील घरपणकर, माजी नगरसेवक अजित ठाणेकर आणि विशाल शिराळकर यांच्या हस्ते चषक व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे नियोजन रामराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटील तसेच सेक अकॅडमीचे प्रशिक्षक अनिल अडसुळे, निमेश देसाई, पंकज देसाई, रोहन ओतारी, दिग्विजय सुतार, ओंकार गोसावी, संतोष अतिग्रे, अमर सूर्यवंशी, शिवराज लिंगम, पृथ्वीराज देसाई, अमन शेख, आकाश शिंदे आणि प्रशांत चिले यांनी केले.
——————————
आप्पा चषक २०२६ : महाराष्ट्र अकॅडमी व सेक अकॅडमीचे वर्चस्व
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
83 %
9.5kmh
84 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

