विवेकानंद कॉलेजच्या बीबीए आणि एमबीए विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश
• संकेत खद्रे याला तब्बल १८ लाखांचे सर्वोच्च पॅकेज
कोल्हापूर :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कॉलेजने आपल्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण दर्जामधील उत्कृष्टतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. कॉलेजच्या बीबीए आणि एमबीए मधील विद्यार्थ्यांची विविध नामांकित नॅशनल आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे. बिझनेस ॲनालिटिक्स विभागात शिक्षण घेत असलेल्या संकेत खद्रे याने सर्वाधिक १८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवले आहे.
ह्युमन रिसोर्स मधील श्रेया भोसलेला १० लाखांचे, तर याच विभागातील प्रणाली भामनगोल हिला ५.६ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. फायनान्स विभागातील कुणाल भोसले याला ४ लाख आणि मार्केटिंगमधील शालिनी जांगीड हिला देखील ४ लाखांच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. याशिवाय इतर अनेक विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी कॉलेजच्या आवारात एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील आणि आयक्यूएसी प्रमुख डॉ. श्रुती जोशी, बीबीए आणि एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. विराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी सीईओ कौस्तुभ गावडे यांनी मार्गदर्शन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, आयक्यूएसी प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि आभार डॉ. विराज जाधव यांनी केले.
——————————
विवेकानंद कॉलेजच्या बीबीए आणि एमबीए विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
80 %
9.2kmh
94 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°

