Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे या विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे या विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि वायफाय फाउंडेशन पुणे यांच्यात विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व उद्योजकता वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत संजय घोडावत इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये अत्याधुनिक वायफाय फाउंडेशन इन्क्युबॅशन सेंटर सुरू होणार आहे.
या उपक्रमांतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी साईशा गावंडे आणि त्यांच्या टीमला स्केलेबल स्टार्टअप्ससाठी परिसंस्था निर्मिती या प्रकल्पास  इक्विटी शेअरिंग आधारित तब्बल ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर झाले आहे. या प्रकल्पास मार्गदर्शक इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील थिकने, प्रा. मुजामिल बेपारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, मेंटरशिप, उद्योग संपर्क, गुंतवणूकदार नेटवर्क आणि स्टार्टअप विकासासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य वायफाय फाउंडेशन पुणे अंतर्गत दिले जाणार आहे.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
68 %
5.7kmh
36 %
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page