Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा निरोप समारंभ उत्साहात

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा निरोप समारंभ उत्साहात

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) या अभ्यासक्रमाची चाळीस विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले होते. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षीय भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसरच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सेफ्टी ऑफिसर हा केवळ उद्योगातील कर्मचारी नसून अनेक कुटुंबांच्या सुरक्षिततेचा रक्षक असतो. उद्योगातील प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि त्यांचे संरक्षण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील करिअरच्या संधी, शिस्त आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवनात सुरक्षितता संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.
डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट कोर्सेसचे विभागप्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनी समीक्षा जोशी यांनी केले. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी ऋषिकेश केसरकर तसेच सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन  संजय घोडावत यांनी सेफ्टी ऑफिसर पदावर रुजू होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शिक्षक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page