Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड

डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड

• यश मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी
कोल्हापूर :
येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणारा ओंकार चोडणकर या विद्यार्थ्यांची स्नेइडर इलेक्ट्रिक बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे.
कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड झाली आहे.या प्रक्रियेमध्ये देशभरातील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३ राज्यांमधून केवळ १२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रमधून निवड होणारा ओंकार  हा एकमेव विद्यार्थी आहे. त्याला ५ लाख ५० हजार रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
निवड प्रक्रियेमध्ये ग्रुप डिस्कशन, टेक्निकल राउंड, मॅनेजेरियल राउंड आणि एचआर राउंड अशा चार टप्प्यांचा समावेश होता. उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ओंकारने हे यश संपादन केले.
कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, विभागप्रमुख डॉ. विद्या अब्दुलपूरकर, टीपीओ प्रिती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
ओंकारच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.5 ° C
28.5 °
28.5 °
79 %
11.9kmh
93 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page