Homeइतरसरपंच कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६’

सरपंच कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६’

कोल्हापूर :
प्रगत शेती व वैज्ञानिक पीक पोषण पद्धतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल पन्हाळा तालुक्यातील सरपंच सौ. कविता सरदार माने यांना महाधन अ‍ॅग्रीटेक लिमिटेडतर्फे प्रतिष्ठेचा ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर येथे आयोजित समारंभात शेतकरी, ग्रामस्थ, कृषी क्षेत्रातील मान्यवर आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऊस लागवडीत संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रभावी वापर करून उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. महाधनच्या क्रॉपटेक ९:२४:२४ मुळे उसाची वाढ, जाडी आणि उत्पादनात सुधारणा होऊन सुमारे १५ टक्के अधिक आर्थिक परतावा मिळाल्याचे सौ. कविता माने यांनी सांगितले.
महाधन अ‍ॅग्रीटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश देशमुख यांनी विज्ञानाधारित शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page