• कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी एकाचवेळी सर्व पेट्रोल पंपांवर आंदोलन
कोल्हापूर :
पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात कोल्हापूर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी (दि.२१) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमधील ३०० पेट्रोल पंपांवर एकाचवेळी आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील स्वतः एका पेट्रोल पंपावर आंदोलन करणार आहेत. शिवाय आजी-माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहतुकीवर होत नसून, त्याचा थेट फटका भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या रूपाने बसतो. या महागाईमुळे सामान्य माणसाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर डिझेल दरवाढीमुळे आणि पुरेसे इंधन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. याविरुद्ध काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांशी संवाद साधणार असून दरवाढीमुळे त्यांच्यावर पडणाऱ्या आर्थिक भाराविषयी जनजागृती केली जाणार आहे. शिवाय या अन्यायकारक दरवाढी विरोधात नाराजी नोंदवण्यासाठी आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्षाची ऑनलाईन याचिका (e-petition) भरण्याची विनंती देखील वाहनचालकांना करण्यात येणार आहे.
——————————
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार
Mumbai
haze
30
°
C
30
°
30
°
70 %
3.1kmh
40 %
Wed
30
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
30
°
Sun
30
°

