Homeकला - क्रीडाउत्तरेश्वर आणि संध्यामठची विजयी घोडदौड

उत्तरेश्वर आणि संध्यामठची विजयी घोडदौड

• शिवाजी-प्रॅक्टीस सामना बरोबरीत
• वेट्रन फुटबॉल स्पर्धेत रंगत वाढली
कोल्हापूर :
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या (वेट्रन) फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली. दोन्ही संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला.
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मंगळवारी सकाळच्या सत्रातील शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुणावर समाधान मानावे लागले. प्रॅक्टीस फुटबॉल क्लब आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात प्रॅक्टीसकडून नितीन भोसलेने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र उत्तरार्धात प्रॅक्टीसच्या गणेश देसाई याच्याकडून हॅण्डबॉल झाल्याने शिवाजी संघाला पेनल्टी मिळाली. या संधीचा अचूक फायदा घेत निलेश साठे याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. अखेर सामना बरोबरीत संपल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात उत्तरेश्वरकडून विकी खाडेने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खंडोबाकडून संदीप वणीरे याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात उत्तरेश्वरला पेनल्टी किक मिळाली. या पेनल्टीवर अनिरुद्ध घाटगे याने अचूक गोल नोंदवत संघाचा २-१ असा विजय निश्चित केला.
दुसऱ्या सामन्यात संध्यामठ संघाने फुलेवाडीवर २-० असा विजय मिळवला. पूर्वार्धात चंद्रकांत जांभळे याने गोल करत संध्यामठला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात फुलेवाडीच्या खेळाडूकडून झालेल्या स्वयंगोलमुळे संध्यामठला आपसूकच गोल मिळाल्याने आघाडी २-० अशी झाली. अखेरपर्यंत २-० गोलची आघाडी राखत संध्यामठने विजयावर शिक्कामोर्तब झाले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
79 %
12.3kmh
100 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page