Homeकला - क्रीडासात वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत शिवराज कामते व वेदांती देसाई अजिंक्य

सात वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत शिवराज कामते व वेदांती देसाई अजिंक्य

• वेदांत हळबे व इनाया मुजावर उपविजेते
कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या जी. एच. रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा सात वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा सोमवारी आयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. मुलांच्या गटात अंतिम चौथ्या फेरीनंतर कोल्हापूरच्या शिवराज कामतेने चार पैकी चार गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर कोल्हापूरच्याच वेदांत हळबे तीन गुण व साडेनऊ टायब्रेक गुणासह उपविजेता ठरला.
मुलींच्या गटात अंतिम चौथ्या फेरीनंतर जयसिंगपूरच्या वेदांती देसाईने चार गुण मिळवून विजेतेपद मिळविले तर कोल्हापूरच्या इनाया मुजावरला तीन गुणांसह उपविजेतेपद मिळाले. हे चौघेजण ३० व ३१ मे दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हाचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रिया हिरवडेकर व अदिती पिळणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भरत चौगुले व मनिष मारुलकर उपस्थित होते. एकूण रोख चार हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून देण्यात आले. जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनने या स्पर्धा पुरस्कृत केल्या होत्या.
उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांमध्ये मुले रियांश गिरगावकर कोल्हापूर, रिशान पिळणकर कोल्हापूर, रियांश चौगुले कोल्हापूर व श्रेयस पांडव इचलकरंजी तसेच मुलींमध्ये माऊली हिरवडेकर कोल्हापूर, हिंदवी पाटील कोल्हापूर, राजमुद्रा भोसले कोल्हापूर, राजनंदिनी गिरी कोल्हापूर व निहारिका कांबळे कोल्हापूर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page