Homeकला - क्रीडाउत्तरेश्वर, संध्यामठ आणि पाटाकडील संघांची विजयी सलामी

उत्तरेश्वर, संध्यामठ आणि पाटाकडील संघांची विजयी सलामी

• शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वेट्रन फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर :
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या (वेट्रन) फुटबॉल स्पर्धेला सोमवारी (दि.१८) छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे उत्साहात प्रारंभ झाला. आज झालेल्या सामन्यांत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजयी सलामी दिली.
सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात उत्तरेश्वर आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात चुरशीची लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात उत्तरेश्वरकडून दीपक कदम यांनी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फुलेवाडीच्या अमर पाटील यांनी गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात उत्तरेश्वरच्या अनिरुद्ध घाटगे यांनी निर्णायक गोल नोंदवत संघाला २-१ असा विजय मिळवून दिला. या विजयासह उत्तरेश्वर संघाने तीन गुणांची कमाई केली.
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात संध्यामठने खंडोबा तालीम मंडळवर ४-० अशी एकतर्फी मात केली. पूर्वार्धात योगेश सरनाईक यांनी गोल करत संघाचे खाते उघडले. उत्तरार्धात अमोल सरनाईक, प्रदीप पाटील आणि पुन्हा योगेश सरनाईक यांनी गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह संध्यामठने तीन गुणांची कमाई केली.
दुसऱ्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची नोंद झाली नाही. उत्तरार्धात धनंजय यादव यांनी हेडव्दारे गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. या एकमेव गोलच्या जोरावर पाटाकडीलने विजय मिळवून तीन गुण प्राप्त केले.
स्पर्धेचे उदघाटन प्रभाकर पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद माने होते. यावेळी कर्नल दिलीप थोरात, डॉ. मुग्धा पाटील, डॉ. बेलेकर, आरोग्यदूत बंटी सावंत, पाटाकडील तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शरद माळी, शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील, किरण साळोखे, उदय पाटील, प्रमोद भोसले, सुशील गायकवाड, आशिष पाटील, शिवाजी घाडगे, संतोष कामते आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page