Homeकला - क्रीडाचला पाहूया, खेळ जेष्ठ फुटबॉलपटूंचा

चला पाहूया, खेळ जेष्ठ फुटबॉलपटूंचा

• शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सोमवारपासून ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंची स्पर्धा
कोल्हापूर :
शहरातील फुटबॉल परंपरेला उजाळा देण्यासाठी शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ४१ वर्षांवरील ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंसाठी विशेष फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १८ ते २४ मे २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होणार असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील, किरण साळोखे व उदय पाटील यांनी दिली. यावेळी नगरसेवक विनायक फाळके, प्रमोद भोसले, आशिष पाटील, संतोष कामते, सुशील गायकवाड उपस्थित होते.
ते म्हणाले की, स्पर्धेतील सामने सकाळी व दुपारच्या सत्रात खेळविण्यात येणार असून कोल्हापुरातील ज्येष्ठ फुटबॉलप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील विविध नामांकित फुटबॉल संघांकडून खेळलेले अनुभवी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेत कोल्हापुरातील दिलबहार , प्रॅक्टीस, शिवाजी, पीटीएम, खंडोबा, फुलेवाडी, उत्तरेश्वर, संध्यामठ हे आठ संघ सहभागी आहेत.
या आठ संघांची दोन गटात विभागणी केली असून त्यांच्यात साखळी व बाद पध्दतीने सामने होतील. स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या संघाला १० हजार रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘बेस्ट गोलकिपर’, ‘बेस्ट फॉरवर्ड’, ‘बेस्ट हाफ’ आणि ‘बेस्ट डिफेन्स’ यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेमुळे जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अनेक माजी खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेतील सामने रंगतदार होणार शक्यता व्यक्त होत असून त्यांचा दर्जेदार खेळ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी फुटबॉलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28 ° C
28 °
28 °
82 %
12.1kmh
83 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page