Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या १३२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या १३२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या १३२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळाले आहे.
महाविद्यायाद्वारे घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये जे.एन.के, मुंबई कंपनीमध्ये मेकॅनिकल विभागाच्या अर्जुन जाधव, शुभम पाटील या दोघांची ४ लाख प्रतीवर्ष पॅकेज वरती निवड करण्यात आली. एसकेएचएम या कंपनीत ४, बजाज ऑटोमध्ये ५, टी.ई कनेक्टीव्हिटी कंपनीत ९२ विद्यार्थ्यांचे तसेच विडजेन इंडिया या कंपनीमध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना सरासरी दोन ते अडीच लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले की, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि महाविद्यालयाकडून देण्यात येत असलेल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे हे यश मिळाले आहे. यापुढेही अधिकाधिक विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
27 ° C
27 °
27 °
89 %
3.1kmh
15 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page