Homeसामाजिकखासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथे बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण

खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथे बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण

कोल्हापूर :
महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथे बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण महापौर सौ. रुपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या हस्ते पार पडले.
महिला भाविक, पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. या स्वच्छतागृहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तर आहेच पण हे स्मार्ट सॅनिटेशन सोल्यूशन आहे. स्वच्छता गृहाला जोडूनच महिलांच्या गरजेच्या वस्तू विक्रीसाठी दुकान असल्याने बचत गटातील महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती. दरम्यान कोल्हापुर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. २५ वर्षाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला.
या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, आणि ताराबाई पार्क येथील एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. दोन महिन्यात ही स्वच्छतागृहे बांधून तयार झाली असून, महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी महापौर सौ. रुपारणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते व खा. धनंजय महाडिक, आ. अशोकराव माने, उप महापौर अक्षय जरग, स्थायी सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना वूलू ह्या स्वच्छतागृहांच्या आधुनिकता, स्वच्छता व सुरक्षा याविषयी माहिती दिली. यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, आश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी व्हटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजीत पोवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page