• दिलबहारचा संध्यामठवर २-१ने विजय
कोल्हापूर :
संकेत नितीन साळोखेने नोंदवलेल्या हॅटट्रिकसह चार गोलच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळने रंकाळा तालीम मंडळवर ५-० गोलने एकतर्फी विजय मिळवला. तसेच दिलबहार तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळचा २ विरूध्द १ गोलने पराभव केला. या विजयासह दोन्ही संघांनी स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर फुटबॉल चषक स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी दुपारी झालेल्या सामन्यात ‘शिवाजी’ने रंकाळा तालीमवर एकतर्फी विजय मिळवला. संकेत नितीन साळोखेने स्पर्धेत पहिली हॅटट्रिक नोंदवण्याचा मान मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच शिवाजी तरुण मंडळने आक्रमक खेळ करत रंकाळा तालीमवर दबाव निर्माण केला. सामन्याच्या ६व्या मिनिटाला इंद्रजीत चौगुलेने दिलेल्या अचूक पासवर संकेत साळोखेने जोरदार फटका मारला. गोलरक्षकाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ताबा मिळवत संकेतने गोल साधत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर २६व्या मिनिटाला संकेतने मोठ्या डीच्या बाहेरून थेट गोलजाळ्यात चेंडू धाडत शानदार गोल नोंदवला आणि संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली.
उत्तरार्धातही संकेतने उत्कृष्ट खेळ करत इंद्रजीत चौगुलेने दिलेल्या पासवर ५२व्या तर यश जांभळे त्या पासवर ५९व्या मिनिटाला गोल करत स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक पूर्ण केली. यानंतर संकेतच्या पासवर ५८व्या मिनिटाला यश जांभळेनेही गोल करत संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. रंकाळा तालीमकडून पृथ्वीराज पाटील, सोहम निकम, अमोल भोसले, विवेक पाटील, स्वप्नील तेलवेकर आणि सौरभ हुलस्वार यांनी चांगला खेळ करत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
दरम्यान, दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळाचा २-१ असा पराभव केला. दिलबहारकडून १८व्या मिनिटाला प्रथम भोसले आणि ६५व्या मिनिटाला स्वयंम साळोखे यांनी गोल केले. संध्यामठकडून हेमंत वस्तादने ७०व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. अखेर उर्वरित वेळेत २-१ची आघाडी राखत दिलबहारने सामना जिंकला.
——————-
आजचे सामने….
• सम्राटनगर – मर्दानी आखाडा : दु. २ वा.
• बालगोपाल – प्रॅक्टीस : दुपारी ४ वाजता
—————————— ————————-

——————————