कोल्हापूर :
येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दसरा चौकातील ऐतिहासिक पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
गेली ४५ वर्षे ट्रस्टच्या स्थापनेपासून दरवर्षी हा अभिवादनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, राजर्षींच्या सामाजिक विचारांना अभिवादन करण्याची परंपरा जपली जात आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पोलीस अधीक्षक नोलोत्पल, विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, विश्वस्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे सदस्य सचिव गजानन गुरव, विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आणि व्यवस्थापक डी. एम. नांगरे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होते.
दसरा चौकातील अभिवादनानंतर राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यालाही पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी ट्रस्टच्या कामकाजाबाबत व येणाऱ्या जयंती दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची चर्चा झाली.
सन १९८१ मध्ये स्थापन झालेल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत राजर्षी शाहू महाराजांची जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार, कोल्हापूर पर्यटनाला चालना तसेच साहित्य, कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शाहू समाधी स्थळाला भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.6
°
C
28.6
°
28.6
°
75 %
4.6kmh
0 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

